चिकू आंतरमशागत

जमीन

उत्तम निचऱ्याची, खोल मध्यम काळी जमीन .

हवामान
उष्ण व दमट, जास्त पावसाचा प्रदेश चुनखडीयुक्त जमीन अयोग्य ठरते.

जाती
कालीपत्ती, क्रिकेटबॉल.

अभिवृद्धीचा प्रकार
खिरणी खुंट वापरून तयार केलेले भेट कलम किंवा शेंडा कलम.

लागवडीचे अंतर
दोन झाडातील व ओळीतील अंतर १० x १० मीटर, प्रति हेक्टरी झाडांची संख्या १००.

खते
१ x १ x १ मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात २ ते २.५ किलो सुपर फॉस्फेट व ४ ते ५ घमेली शेणखत किंवा कंपोष्ट खत टाकावे. पोयटा मातीने सर्व मिश्रणासहित खड्डा भरून घ्यावा. पूर्ण वाढ झालेल्या झाडास १०० किलो शेणखत, ३ किलो नत्र, २ किलो स्फुरद व २ किलो पालाश सप्टेंबर, जून महिन्यात विभागून द्यावे.

इतर महत्त्वाचे
खिरणीच्या खुंटावर केलेली कलमेच वापरावीत.

उत्पादन
१५०० ते ३००० फळे प्रत्येक झाडास, आर्थिक आयुष्य ३० ते ५० वर्षे.