जमीन
हलकी ते मध्यम.
जाती
उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण, नरेंद्र बोर-१ इ.
लागवडीचे अंतर
६.० x ६.० मीटर.
खते
शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष. नत्र दोन हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे.
उत्पादन
७५ ते १२५ किलो / झाड इतर महत्त्वाचे मुद्दे.
इतर महत्वाचे मुद्दे
१) बोरांची छाटणी ६० सें. मी. पर्यंत मुख्य खोड ठेवून ४ ते ६ दुय्यम फांद्या ठेऊन छाटणी एप्रिल व मे महिन्यात करावी. खुंटावरील फुट वेळोवेळी छाटावी.
२) फळगळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी बागेत मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात.
३) ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढल्यास बागेस एक संरक्षक पाणी द्यावे.