adulsa lagwad in marathi
अडुळसा लागवड करण्यापूर्वी

अडुळसा लागवड करण्यापूर्वी

हंगाम (पेरणीची वेळ)
खरीप.

जमीन
पोयट्याची, ऊत्तम निचरा होणारी जमीन.

पूर्व मशागत
उभी - आडवी नांगरट करुन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

लागवड पध्दत
६० x ६० से.मी. अंतरावर लागवड करावी.

हेक्टरी खते (किलो)
पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी २० टन शेणखत व ५० : २५ : २५ नत्र स्फुरद व पालाश अनुक्रमे लागवडीच्या वेळी द्यावे नंतर ५० कि. नत्राचा एक हप्ता ४० ते ४५ दिवसांनी द्यावा.

आंतरमशागत, पाणी
गरजेनेसार खुरपण्या करून शेत तणमुक्त ठेवावे. हे पीक पाण्यास चांगला प्रतीसाद देते. उन्हाळ्यात ७ ते १०दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

काढणी
वर्षातून ३ वेळा काढणी करता येते.

उत्पन्न
८० ते ९०क्विंटल पहिल्यावर्षी व ९० ते १०० क्विंटल, दुसऱ्या वर्षी ओली पाने प्रति हेक्टरी मिळतात.

प्रक्रिया
पाने काढून सावलीत सुकवावीत व स्वच्छ कोरड्या जागेत पोत्यात भरून ठेवावीत.

वापरावयाचा भाग
पाने.

उपयोग
जंतूनाशक, अतिसार, दमा व खोकल्यात, रक्तशुध्दीसाठी, नेत्रविकार.

बाजारभाव
वाळलेली पाने ५० ते ६० रुपये प्रति किलो.