खाजकुहिली पाणी व्यवस्थापन

हंगाम
खरिप : जुन - जुलै.

जमीन
उत्तम निचरा होणारी, हलकी ते भारी जमीन.

पुर्व मशागत
जमीन उभी आडवी नांगरुन कुळवाच्या २-३पाळ्या द्याव्यात. १०-१५ टन कुजलेले शेणखत.

हेक्टरी बियाणे
२०-२५ किलो बियाणे.

लागवड पध्दत
सरी वरंबे किंवा सपाट वाफे १ ४१ मी. अंतरावर टाकणे पध्दतीने लागवड करावी. प्रत्येक ठिकाणी २ बिया २-३ सेंमी. खोलवर लावाव्यात.

खते (किलो/हे)
लागवडीच्या वेळी १००-१५० किलो डि. ओ. पी. ४५ ते ७५ दिवसांनी प्रत्येकी २५ - ३० किलो नत्राचे दोन हप्ते द्यावेत.

आंतरमशागत, पाणी
वेलींना आधारासाठी १.५ ते २.० मी. उंचीचा मंडप किंवा ताटी तयार करावी. त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होते. पाण्याच्या ४-६ पाळ्या २५-३० दिवसांच्या अंतराने द्याव्यात.

काढणी / कापणी
संपूर्ण शेंगा पक्व झाल्यानंतर काढणी करावी. नंतर उन्हात वाळवून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात.

उत्पादन
१५-१७ क्विंटल प्रति हेक्टरी सिंचनाखाली ३०-३५ क्विंटल

उपयोग
मुळ्या व बियाचा उपयोग पक्षघात, अशक्तपणावर बियांचे चुर्ण उपयोगी असते. मुत्ररोग, किडनीचे विकार यामध्ये त्याचा उपयोग होतो. दमा, खोकला, रक्तरोग, शुक्राशय या रोगावर गुणकारी.