vekhandache fayde
वेखंड उत्पादन

वेखंड उत्पादन

हंगाम (पेरणीचा वेळ)
खरीप सिंचनासाठी वर्षभर.

जमीन
मध्यम ते भारी, गाळाची पाणी साचणारी, भात खाचरात, पोयट्याची ओलावा धरुन ठेवणारी.

पूर्व मशागत
खोल नांगरट व २ - ३ कुळवाच्या पाळ्या २० गाड्या शेणखत मिसळावे.

लागवड पध्दत
सपाट वाफ्यात मुळे फुटलेली रोपे किंवा कोवळे शेंडे ३० ४३० सेंमी. अंतरावर लावावीत व सारखे पाणी साचवून ठेवावे. पिकाची ५-६ वेळा निंदणी करावी. लागवडीच्या वेळी २००-३०० किलो सुफला प्रति हेक्टरी द्यावा.

हेक्टरी खते ( किलो)
हेक्टरी २०:४०:४० नत्र, स्फुरद व पालाश अनुक्रमे लागवडीच्या वेळी द्यावे.

काढणी / कापणी
एका वर्षानंतर पाने पिवळी झाल्यावर कंदमुळे खोदन काढून तंतमुळे.

उत्पादन
विरहीत करुन ५-१० सेंमी. लांबीचे तुकडे करावे. साधारण हेक्टरी ५ ते ८ टन उत्पादन येते.

उपयोग
बुध्दीस हितकर, सुगंधी अग्निदिपक, पाचक उलटी आणणारे जंतू व कृमीनाशक असून मुळव्याध. सर्दी पडसे डोकेदुखी, उन्माद, अपस्मार मुर्छा, पोटदुखी , अतिसार, त्रिदोषावर उपयोगी.